दाभाडी मर्डर प्रकरण! पोलिसांनी डॉक्टरच्या सालीला केले अटक; पत्नीच्या बहिणीसोबत होते डॉक्टरचे अनैतिक संबंध...१० वर्षांपासून करायचा अय्याशी ..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला चक्रावून टाकणाऱ्या दाभाडी मर्डर प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. दरोड्याचा बनाव रचून डॉक्टर गजानन टेकाळे याने पत्नी माधुरीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने डॉक्टर ने पत्नीचा जीव घेतला..आता या प्रकरणात डॉक्टरचे जिच्या सोबत अनैतिक संबंध होते त्या तरुणीला देखील अटक केली आहे. विशेष म्हणजे ती तरुणी म्हणजे डॉक्टरची साली (बायकोची बहीण) आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर गजानन टेकाळे याचे त्याच्या २७ वर्षीय मेहुणी(साली) सोबत अनैतिक संबंध होते. गत १० वर्षांपासून हे संबंध होते..त्यातील नको त्या क्षणांचे चित्रीकरण देखील डॉक्टरच्या मोबाईल मध्ये होते. १० वर्षांपासून डॉक्टर अय्याशी करत होता. आता तिच्याकडून डॉक्टर वर लग्नासाठी दबाव वाढत होता. १६ जानेवारी रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमात तिने डॉक्टरला लग्नाबाबत विचारणा करून धमकी देखील दिली होती..या दबावामुळेच डॉक्टरने पत्नी माधुरीच्या हत्येचा कट रचला..त्यामुळे आता पोलिसांनी त्या तरुणीला देखील अटक केली आहे.
.