साखरखेर्डा येथे चाेरट्यांचा हैदाेस! हजाराे रुपयांचा एवज केला लंपास; पाेलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेली घरे फोडली...!

 
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :साखरखेर्डा पाेलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेली तीन ते चार घरे चाेरट्यांनी फाेडून हजाराे रुपयांचा एवज लंपास केला. ही घटना २८ जुलै राेजी उघडकीस आली. या प्रकरणी साखरखेर्डा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साखरखेर्डा गावात चाेरट्यांनी २७ जुलैच्या रात्री चाेरट्यांनी हैदाेस घातला. पाेलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले तीन ते चार बंद असलेल्या घरातून चाेरट्यांना हजाराे रुपयांचा एवज लंपास केला. वार्ड क्रमांक पाचमध्ये राहणाऱ्या राजु ठाेंबरे यांच्या घरात चाेरट्यांनी प्रवेश करून सात हजार रुपये राेख आणि दागिणे लंपास केले.गावातीलच क्षिरसागर बंधूची दाेन्ही घरे, वार्ड क्रमांक चार मधील साेहेल अश्पाक खान यांच्या घरातून चाेरट्यांनी राेख २५ हजार आणि दागिणे लंपास करण्यात आले. या प्रकरणी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.