महामार्गावर 'द बर्निंग ट्रक'; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला...
Dec 5, 2025, 15:32 IST
एका ट्रकला आग अचानक भीषण आग लागल्याची माहिती समाजसेवक अनिल गांधी व साजिद खान यांनी भ्रमणध्वनीद्वारे अग्निशमन विभागाला दिली. सूचना मिळताच अग्निशमन दलाचे चालक वासुदेव भोपळे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मुंदडा पेट्रोल पंपाचे मॅनेजर विष्णू संबारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाचे वासुदेव भोपळे यांना महत्त्वाची साथ दिली. संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर अल्पावधीत नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या तात्काळ कारवाईमुळे ट्रकचे होणारे मोठे नुकसान टळले असून परिसरातील वाहतूकही सुरळीत ठेवण्यात आली. या जलद प्रतिसादाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. सदर ट्रक क्रमांक आरजी-०९-जीसी-१७४१ च्या लायनरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन तो जाम झाल्याने चाकांनी पेट घेतला, असे ट्रक चालकाने सांगितले. हा ट्रक देवासवरून स्टाईल घेऊन हैदराबादकडे जात होता. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहाणी झाली नाही.
