फ्लॅटची वास्तुशांती झाली अन् त्याच दिवशी फ्लॅट मध्ये वाईट घडलं! बुलडाण्यातील गणेश नगरातील घटना; मॅटर पोलिसांत गेले....
ज्ञानेश्वर रिंढे(४०, रा. म्हाडा कॉलनी, गणेश नगर, बुलडाणा) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. १ सप्टेंबरला त्यांनी गणेश नगरात घेतलेल्या फ्लॅटची वास्तुशांती झाली. त्याआधी वास्तुशांतीचे समान आणण्यासाठी ते पत्नीसह बाजारात गेले तेव्हा त्यांच्या पत्नीने ३ तोळ्याचे सोन्याचे गंठण नवीन बनवलेल्या ड्रेसिंग टेबल च्या आतील ड्रॉवरमध्ये ठेवले होते. त्यावेळी घरात कामगार फर्निचर चे व पेटिंग काम करीत होते.
घरी आल्यानंतर त्यांना दागिने दिसले नाहीत. दागिन्यांची किंमत १ लाख ८० हजार रुपये एवढी होती. याबद्दल घरातील पेंटिंग करणाऱ्या कामगाराला विचारणा केली असता त्याने हतेडी येथील फर्निचर चे काम करणाऱ्यांकडे बोट दाखवले. तोपर्यंत हतेडी येथील कामगार निघून गेले होते. त्यामुळे फ्लॅट मालकाने हतेडी खुर्द येथील अनिल जांगिड, गणेश नाडे व निलेश सरकटे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. तिघांविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश बाजड करीत आहेत.