BREAKING जिल्हा हादरला! मेहकरच्या निवांत लॉजवर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शाळेत जाताना दोघांनी उचलले अन् साडेचार तास..

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आता बुलडाणा जिल्हा हादरवून सोडणारी बातमी मेहकर मधून समोर आली आहे . मेहकरच्या हॉटेल निवांत वर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलगी शाळेत जात असताना २० वर्षीय तरुणाने एका मित्राच्या सहाय्याने मुलीला बळजबळी उचलून मोटार सायकलवर बसवले, आणि हॉटेल वर नेऊन बलात्कार केला. घडलेली हकीकत कोणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली.सकाळी साडेअकरा वाजता मोटरसायकलवर घेऊन गेलेल्या मुलीची तब्बल साडेचार तासांनी आरोपींनी सुटका केली..

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी मेहकर शहरातील राहणारी असून १५ वर्षांची आहे. पीडित मुलगी अनुसूचित जातीची आहे. काल,१६ जानेवारीला सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण (२०, रा.खंडाळा देवी, ता.मेहकर) व ओम पऱ्हाड (२०, रा.बाभुळखेड) या दोघांनी तिला अडवले. जबरदस्ती मोटारसायकल वर बसवून निवांत लॉजवर नेले. तिथे मोहन चव्हाण हा पंडित मुलीला एका खोलीत घेऊन गेला. तिथे मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी त्याला नकार देत होती, मात्र तरी देखील वासनेचे भूत संचारलेला मोहन थांबण्याचे नाव घेत नव्हता. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी मोहन याने दिली. दुपारी ४ वाजता आरोपी मोहनने पीडित मुलीला शहरात सोडून दिले, त्यानंतर पीडित मुलीने घरी गेल्यानंतर हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. या प्रकाराने हादरलेल्या कुटुंबीयांनी आहे मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मोहन सह त्याला सहकार्य करणाऱ्या ओम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
निवांत लॉजवर मेहेरबान कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी देखील निवांत लॉज वर पाप करतांना अनेकांना रंगेहाथ पकडले आहे. एवढे कुकर्म या ठिकाणी होत असताना देखील हॉटेलवर कोणतीही कारवाई झालेली नाही. हॉटेल मालकाच्या पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्यामुळेच कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.. मेहकर शहरात यादी काही अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्याचे घटनास्थळ देखील निवांत लॉज होते असेही सूत्रांनी सांगितले, त्यामुळे निवांत लॉजवर मेहेरबान कोण? अशी चर्चा आता मेहकर परिसरात सुरू आहे..