BREAKING जिल्हा पुरवठा अधिकारी लाचखोर निघाला! २५ हजार खाताना रंगेहाथ पकडला....
Jul 23, 2025, 14:37 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे लाचखोर निघाला. २५ हजार रुपयांची लाच खाताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यासोबतच पुरवठा विभागातील एक सेवानिवृत्त कर्मचारी देखील अडकला आहे.. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातच लाच–लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई सध्या सुरू असून थोड्या वेळात सविस्तर वृत्त देण्यात येईल..