बोलेरो पीकअपने स्कुटीला उडवले! तरुणीचा मृत्यू; आई गंभीर! बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकातील घटना...
Feb 10, 2025, 20:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव बोलेरो पिकअप ने स्कुटीला धडक दिली. या अपघातात स्कुटी चालवणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणीची आई गंभीर जखमी आहे. आज,१० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकात ही घटना घडली.
स्नेहल संदीप चौधरी (२४, रा. साखळी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव असून छाया संदीप चौधरी (५४) या गंभीर जखमी झाले आहेत. दोघी मायलेकी बुलढाणा शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये जात होत्या. त्यावेळी बोलेरो पिकअप ने ( क्रमांक एम एच २८, एबी ११८८) ने त्यांना पाठीमागून उडवले. या अपघातात स्कुटी चालवणारी स्नेहल दूर फेकल्या गेल्याने डोक्याला गंभीर दुखात झाली. तर छाया चौधरी या देखील जखमी झाल्या. दोघा मायलेकींना स्थानिकांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी स्नेहल ला मृत घोषित केले. सध्या छाया चौधरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बोलेरो पिकअप चालकाला ताब्यात घेतली आहे.