१५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा अखेर मृतदेहच आढळला; अंत्री शिवारातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह..!

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : १५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या ३२ वर्षीय युवकाचा अखेर ५ सप्टेंबर रोजी मृतदेहच आढळला. श्रीकृष्ण दयाराम कोळसे असे मृतक युवकाचे नाव आहे.

अंत्री येथील श्रीकृष्ण दयाराम कोळसे हा युवक मागील १४ दिवसापासून घरुन निघून गेला होता. त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नव्हतो. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी गावातील निवृत्ती 
पंढरी जवरे यांचे अंत्री शिवारातील शेतामधील
विहिरीत एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतक युवकाचे वडील दयाराम कोळसे व गावातील लोकांनी सदर विहिरीवर जावून पाहणी केली असता अंगावरील कपडे व त्याच्या हातातील मण्याची माळ, शरिर बांधावरुन सदर मृतदेह श्रीकृष्ण कोळसे याचे असल्याचे समोर आले. पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी दयाराम कोळसे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केल आहे.