बेपत्ता महिलेचा मृतदेहच आढळला! आत्महत्या की घातपात? अमडापुर पोलीस घेत आहेत शोध....

 
 अमडापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरून बेपत्ता असलेल्या महिलेचा थेट मृतदेहच आढळल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी आधी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. दरम्यान आता सावंगी गवळी शिवारातील एका विहिरीत महिलेचा मृतदेहच आढळून आला आहे. प्रभावती विनोद शेजोळ(३७)असे बेपत्ता महिलेचे नाव आहे..

प्रभावती शेजोळ या ३० जानेवारी रोजी बेपत्ता झाल्या होत्या. शेजोळ यांच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता होण्याआधी पती पत्नीचे वाद झाले होते. प्रभावती शेजोळ गायब झाल्यानंतर अमडापूर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. दरम्यान आता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. ही आत्महत्या की घातपात याबाबतच्या चर्चांना उधान आले असून तपास अमडापूर पोलीस करीत आहेत...