रक्तपात थांबायला तयार नाही! जिल्ह्यात पुन्हा एक मर्डर; खामगाव तालुक्यात चाकूने खुपसले; जिल्ह्यातील खुनाचा आकडा २२ वर....

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात खुनाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात १८ खून झाले होते.आता चालू एप्रिल महिन्यात आतापर्यंत चार खून झाले आहेत. खुनाचा आकडा २२ एवढा झाल्याने रक्तपात थांबायला तयार नाही की काय? असाच सवाल उपस्थित होत आहे. काल रात्री खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथेही धक्कादायक घटना समोर आली आहे.एकाचा चाकू खूपसुन खून करण्यात आला आहे.
खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. ईश्वर बाबाराव तायडे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी संशयित म्हणून एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याने खुणाची कबुली देखील दिल्याची समजते. भारत यादव असे संशयित आरोपीचे नाव आहे. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी यांच्यात जुना वाद होता. या वादातूनच हे हत्याकांड झाले आहे. अधिक तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत..या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे..