चिखलीच्या घनश्याम बंगचे काळे कृत्य..! पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

 
चिखली

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली पोलिसांनी अवैध गुटखा प्रकरणी घनश्याम बंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या ताब्यातून १ लाख ९ हजार ७८६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार चिखली शहरातील खलसे प्लॉट मध्ये ही कारवाई करण्यात आली. घनश्याम ठाकुरदास बंग (५९) हा प्रतिबंधित गुटखा साठवून त्याची अवैध विक्री करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा त्याच्या ताब्यातून प्रीमियम नजर, सुगंधित राज निवास गुटखा, विमल पान मसाला असा विविध कंपन्यांचा १ लाख ९ हजार ७८६ रुपयांचा गुटखा जप्त केला. आरोपी घनश्याम बंग विरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.