दुर्दैवी बातमी! माळवद कोसळले; बापलेकांचा दबून मृत्यू; दोन मजुर जखमी! चिखली तालुक्यातील शेलोडीची आज सकाळची घटना...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील शेलोडी येथे माळवद कोसळून बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज,१७ मार्चच्या पहाटे ही घटना घडली.

   प्राप्त माहितीनुसार शेलोडी येथील दामोदर घाडगे यांना जुने माळदाचे घर पाडून नवे घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांनी माळूद पाडण्याचे काम त्यांनी गावातीलच शालिग्राम वाळूस्कर यांना उधडे दिले होते. आज,१७ मार्चच्या सकाळी शालिग्राम वाळूस्कर त्यांचा मुलगा योगेश , राम घाडगे, सुनील नेमाने हे माळूद पाडण्याचे काम करत होते. त्यावेळी जीर्ण झाले माळूद जुन्या लाकडांसह मजुरांच्या अंगावर कोसळले. यात शालिग्राम वाळूस्कर (६५) आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर(३२) यांचा मृत्यू झाला. राम घाडगे आणि सुनील नेमाने हे दोघे जखमी झाली असून गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. दोघांवर चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत..