शेतकऱ्याच्या डोक्यात टाकली कुऱ्हाड; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल! चिखली तालुक्यातील घटना
Oct 11, 2025, 12:20 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जुन्या वादातून शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील अमोना येथे ही घटना घडली. याबाबत अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
लक्ष्मण पुंजाराम पेहरे (२५, रा. अमोना) असे गंभीर जखमी शेतकऱ्याचे नाव असून शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत. लक्ष्मण पेहरे यांचे भाऊ श्रीकृष्ण पुंजाराम पेहरे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार एके दिवशी लक्ष्मण पेहरे हे त्यांच्या शेतामध्ये हजर असताना आरोपी पेहरे यांच्या शेतात जनावरे चारत होते.
लक्ष्मण पेहरे यांनी ती जनावरे हाकलून लावली. त्याचा राग मनात ठेवून आरोपीने लक्ष्मण पेहरे यांना जीवाने मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान बुधवारी लक्ष्मण पेहरे हे शेतातून घरी जात असताना आरोपीने संधी साधून लक्ष्मण यांना कुऱ्हाडीने मारहाण केली. लक्ष्मण पेहरे यांना तात्काळ उपचारासाठी चिखली येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
अशा तक्रारीवरून आरोपी मनोहर जयवंता शितोळे, पार्वताबाई मनोहर शितोळे व पृथ्वीराज मनोहर शितोळे अशा तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९,१२६(२)३५१(२)३(५) नुसता गुन्हा दाखल केला आहे..तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहेत...