

खामगाव-शेगाव मार्गावरील अपघाताची जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्याकडून पाहणी, जखमींची केली विचारपूस...
Apr 2, 2025, 13:41 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शेगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्याजवळ आज,२ एप्रिलच्या पहाटे भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात घटनास्थळी ५ व उपचार सुरू असताना २ अशा एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. २४ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या गंभीर अपघातानंतर जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी संवेदनशीलता दाखवत घटनास्थळी भेट दिली..त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करून आरोग्य यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले..
जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जयपूर लांडे फाट्यावरील अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली.जखमींच्या उपचारा संदर्भात रुग्णालय प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ते निर्देश दिले..