३५ वर्षीय तरुणाला आवडत होती १७ वर्षांची मुलगी! भररस्त्यात अडवून म्हणाला"आय लव्ह यू".. एकतर्फी प्रेमाचा शेवट वाईट झाला..! खामगावची घटना

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकतर्फी प्रेमाचा शेवट कधी चांगला होत नाही..त्यातून जे घडतं वाईटच... एका ३५ वर्षीय तरुणाला एक तर्फी प्रेम अन् एक तर्फी प्रपोज चांगलेच भोवले..आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. खामगाव शहर पोलिस ठाण्यातील हे प्रकरण आहे..

 सागर वसंता इंगळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे..सागरचा डोळा एका १७ वर्षीय तरुणीवर होता. तरुणी मैत्रिणींसोबत कॉलेजला जात होती. त्यावेळी रस्त्यातच सागरने तिला अडवले व "आय लव्ह यू " म्हणत प्रपोज केला. मी तुझ्यावर दोन वर्षांपासून प्रेम करतो असे म्हणत त्याने तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
पोलिसांनी आरोपी सागर इंगळे विरुद्ध कलम ७८,७९ भारतीय न्याय संहिता सहकलंम ८,१२ पोक्सो ॲक्ट २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे..