"इंस्टाग्राम लव्ह" चे भयंकर परिणाम! तो वैजापूराहुन आला अन् खामगावात तिच्यावर बलात्कार केला...पहिल्याच भेटीत घात झाला!

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून काय काय होते याची अनेक प्रकरणे या आधी समोर आली आहे. खामगावातील एका तरुणीला instagram वर एका तरुणाशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले. वैजापूरहून तिला भेटायला आलेल्या तरुणाने पहिल्याच भेटीत तिच्यावर बलात्कार केला..सुनील नंदु सपकाळ (२८, रा. भीमगाव, ता. वैजापूर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. 

  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी २३ वर्षांची आहे. काही दिवसाआधी तिची इंस्टा ग्राम वरून सुनील सपकाळ शी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटींग होऊ लागली. एकमेकांचे फोन नंबरही मिळाले.. इन्स्टाग्रामवरच त्यांचे एकमेकांवर प्रेम झाले..२ ऑगस्ट २०२४ रोजी सुनील तरुणीला भेटायला खामगावला आला. त्या वेळी त्याने तिला शेगाव मेन रोडवरील एका हॉटेलमध्ये नेले. त्याने लग्नाच्या आणाभाका घेतल्या, मी तुझ्याशी लग्न करणार आहे..त्यामुळे जे लग्नानंतर करायचे ते आता केले तरी प्रॉब्लेम नाही असे म्हणत त्याने तरुणीवर जबरदस्ती बलात्कार केला.
 सुख भोगले आता फोन बंद..
दरम्यान या प्रकारानंतर काही दिवस दोघांमध्ये फोनवरून बोलणे सुरू होते. मात्र त्यानंतर तरुणाने त्याचा फोन बंद केला. त्यामूळे ३० जानेवारीला पीडित तरुणीने आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना घडला घटनाक्रम सांगितला. मात्र सुनीलच्या वडिलांनी सुनील इथे आलाच नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने शेगाव शहर पोलीस स्टेशनला जाऊन लग्नाची आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सुनील सपकाळ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..