भीषण अपघात! उभ्या एसटी बसला मोटरसायकल धडकली; तिघे तरुण जागीच ठार; वरदडा फाट्यावर झाला अपघात; एक तरुण बेराळ्याचा, एक वाघापूरचा..

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उभ्या एसटी बसला मोटरसायकल धडकल्याने ३ तरुण जागीच ठार झाले. चिखली मेहकर रस्त्यावरील वरदडा फाट्यावर आज,८ ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघे तरुण चिखली तालुक्यातील राहणारे आहेत.
  गोपाल पंढरी सुरडकर (२१, रा.बेराळा),धनंजय परमेश्वर ठेंग (२५, रा.वाघापूर),सुनील सुभाष सोनुने ३५, रा.खडकपुरा चिखली) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तिघे लव्हाळ्याकडून चिखलीकडे येत होते.
  वरदडा फाट्याजवळ एक बस बंद पडलेल्या अवस्थेत होती. या बसवर दुचाकी धडकली, अपघात एवढा भीषण होता की तिघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तिघांना चिखली येथे हलवले, डॉक्टरांनी तरुणांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी तिघांचे मृतदेह चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.