भिषण! लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव! बिडी पितांना आग लागली?मनोरुग्णाचा पलगांवरच कोळसा; त्याचे जगात कुणीच नव्हते, त्याचा असा "दुर्दैवी" अंत झाला...

 
 लोणार(प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथल्या ग्रामीण रुग्णालयात काल रात्री अग्नितांडव पाहायला मिळाले. ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्ड मध्ये बिडी पिता पिता कपड्याला आग लागली आणि त्यात मनोरुग्णाचा जळून कोळसा झाला.. सदर मनोरुग्ण हा पैठण येथील राहणारा होता त्याचे नाव हरिभाऊ रोकडे असे असल्याचे त्याने रुग्णालयात दाखल करतेवेळी सांगितले होते..

प्राप्त माहितीनुसार काल, २२ डिसेंबरच्या दुपारी लोणार बसस्थानकावरून अत्यावस्थ अवस्थेत एका मनोरुग्णाला लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात ॲम्बुलन्स द्वारे आणले होते. सुरुवातीला त्याने त्याची ओळख सांगितली नाही, मात्र त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचे नाव हरिभाऊ रोकडे रा. पैठण असल्याचे सांगितले होते. त्याला त्याच्या नातेवाईकांबद्दल विचारणा केली असता, या जगात आपले कुणीही नाही असे तो सांगत होता. दरम्यान तपासणीनंतर सदर मनोरुग्णावर ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डात उपचार सुरू होते.रात्रीच्या दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वॉर्ड मधून धूर निघताना दिसला. कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता सदर मनोरुग्ण पलगांवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला दिसला. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत मनोरुग्णाचा जळून कोळसा झालेला होता. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.दरम्यान ही आग मनोरुग्ण बिडी पिता पिता लागल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.. पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत..