दहावीतल्या मुलीला प्रेग्नेंट केले! मुलीला वडील नसल्याचा व असहायतेचा घेतला फायदा..उलट्या,मळमळ होऊ लागल्यावर समोर आले सत्य! मलकापुरात खळबळ...
पीडित मुलगी मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात राहते. आरोपी विशाल(२६) हा त्याच गावचा राहणारा आहे. पीडित मुलीला वडील नाहीत, घरची परिस्थिती बेताची आहे..पीडितेच्या याच परिस्थितीचा फायदा आरोपी विशालने घेतला.
पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार जानेवारी २०२६ पासून आरोपी विशालने मुलीसोबत जवळीक वाढवली. तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेतला. गोड गोड बोलून तिच्यावर प्रेम असल्याचे नाटक केले..मात्र विशालची वासनांध नजर मुलीच्या शरीरावर होती. मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेतो तो तिला गावाबाहेरील निर्जन स्थळी न्यायचा..तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा..जानेवारी२०२६ ते मे२०२६ या काळात त्याने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले..
दरम्यान मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर उपचारासाठी दाखल केल्यावर ती प्रेग्नंट असल्याचे समोर आले.. मुलीला सध्या बुलढाणा येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने विशालच्या अत्याचाराचा पाढा वाचला..आरोपी विशाल विरुद्ध पोलिसांनी बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.