ध्वज काढण्यावरून वेणी गावात तणाव; पोलिस बंदोबस्त वाढवला

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :लोणार तालुक्यातील वेणी गावात अज्ञात महिलेने लावलेला ध्वज काढून टाकण्यात आल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला हाेता. पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. वेणी गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चाेख बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. 

वेणी गावात एका ध्वज खाली उतरवून फेकून दिल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी संबंधित महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, दुसऱ्या एका गटानेही एक दुसरा झेंडा काढण्याचा प्रयत्न केला असून त्यासोबतच तेथील संरक्षणासाठी लावलेले कुंपणही बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला. या घटनांमुळे गावातील वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.