चिखला काकड गावात तणाव! शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख शिवानी वाघ यांना मारहाण; अंगावरचे कपडे फाडले! संजीवनी वाघ यांचे व्हॉट्स ॲप स्टेटस; म्हणाल्या,सगळ संपलं! उद्या सकाळी आत्महत्या करते...
संजीवनी वाघ यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलतांना सांगितले की चिखला काकड गावात काही दिवसाआधी अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांकडून हा पुतळा हलवण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्याला विरोध केला असता आपल्याला सरपंचांनी गावातील काही बायांना ,माणसांना जमा करून मला मारहाण केली, माझ्या अंगावरील कपडेही फाडले असेही संजीवनी वाघ म्हणाल्या..
पोलिसांच्या डोळ्यादेखत कपडे फाडले..
दरम्यान चिखला काकड येथील तणावपूर्ण वातावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत संजीवनी वाघ यांच्या अंगावरील कपडे फाडण्यात येत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याची ही सजा आहे का? असा सवाल शिवानी वाघ यांनी केला असून आपण उद्या सकाळी आत्महत्या करणार आहे असे स्टेटस संजीवनी वाघ यांनी ठेवले आहे..