BREAKING देऊळघाट मध्ये तणाव! शाळेत जाणाऱ्या मुलांचे कुंकू पुसल्याने प्रकरण पांगले; प्रकरण पोलीस ठाण्यात....

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळघाट येथे आज १४ डिसेंबरच्या सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. देऊळघाटच्या जिल्हा परिषद शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या काही मुलांच्या डोक्यावरील कुंकू पुसल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद शाळा आणि उर्दू शाळेचे मैदान एकच आहे, या मैदानावर खेळताना काही मुलांच्या डोक्यावरील कुंकू पुसल्याचा आरोप होत आहे. मुलांनी हे प्रकरण घरी सांगितल्यानंतर आज मुलांचे पालक, गावकरी जिल्हा परिषद शाळेत जाब विचारण्यासाठी दाखल झाले होते..यावेळी १०० ते २०० जणांचा जमाव जमा झाला होता.. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले..सध्या प्रकरण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचले असून अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही...