मंदिरामध्ये चोरी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका चोरट्यास शेंदुर्णी (ता.जामनेर, जि.जळगाव) येथून  अटक केली. संदीप अर्जुन गुजर रा.शेंदुर्णी असे अटकेत घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून अंदाजे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाई मुळे धामणगाव बढे आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची शहानिशा करून त्यास अटक करण्यात आली. अटक केलेल्या संदीप गुजर याच्याविरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल होते. आरोपीकडून पोलिसांनी ५०० ग्रॅम चांदी, चोरीस गेलेला DVR,गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल अंदाजे किंमत ४० हजार रुपये दोन मोबाईल फोन अंदाजे किंमत १८ हजार रुपये असा एकूण ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक, विलास गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव श्रेणिक लोढा, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर बुलकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, हे.कॉ. एजाज खान, पोकॉ.विक्रांत इंगळे, अजीज परसूवाले, अनंता फारताळे, समाधान टेकाळे यांच्या पथकाने केली.