संशयी नवरा अन् सासू! संसारात विघ्न..! बिचारी कंटाळली, पोलिसांनी सांगितली आपबीती! मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल! बुलडाणा तालुक्यातील घटना
Mar 1, 2025, 18:54 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संशयाने अनेक संसार मोडतात..संशय घेतल्याने अनेक वेळा संसारात कुरबुरी झाल्याची उदाहरणे आहेत..काही प्रकरणात एकदम टोकाची भूमिका घेतली जाते..काही संशयी नवरे बायकोवर सातत्याने संशय घेतात..बुलडाणा तालुक्यातील तारापूर येथील एका विवाहितने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत नवरा आणि सासू विरुद्ध तक्रार दिली. नवरा आणि सासू आपल्या चरित्र्यावर सातत्याने संशय घेत असल्याचे तक्रारदार विवाहितेचे म्हणणे आहे..पोलिसांनी संशयी नवरा विठ्ठल समाधान तायडे आणि सासू नंदाबाई समाधान तायडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैशाली विठ्ठल तायडे (२२, रा.तारापूर) या महिलेने प्रकरणाची तक्रार दिली. मुलगी घरात एकटीच ठेवून घराबाहेर का गेली असे म्हणत सासूने विवाहितेसोबत वाद घातला. शिवीगाळ केली. याच वेळी विवाहितेचा पती विठ्ठल तायडे यांनी देखील शिवीगाळ करून काडीने मनगटावर ,मानेवर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नवऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची ही विवाहित करण्यात आले आहे. या प्रकारानंतर विवाहितेने माहेर वरून काकांना बोलवून घेतले व विवाहिता माहेरी गेली. दवाखान्यात उपचार केल्यानंतर विवाहितेने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होत नवरा व सासूविरुद्ध तक्रार दिली आहे...