LCB ची दमदार कारवाई! अकोला जिल्ह्यातील भामट्याला आणले उचलून; वर्दळीच्या ठिकाणी संधी साधून उरकत होता कार्यभाग...

 
 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): LCB चे  प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली टीम LCB ने कारवायांचा धडाका सुरू केला आहे. अट्टल समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारांना सुद्धा LCB ने उचलून आहे. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल देखील टीम LCB ने केली आहे..आता सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा तपास करण्यात आला. यात अकोला जिल्ह्यातून एका भामट्या चोरट्याला उचलून आणले असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या ३ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कलीम उद्दीन सलीम उद्दीन (३२) असे या चोरट्याचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील  राहणारा आहे..

  सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचे विविध गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे हिवरखेड येथून कलिम उद्दीन  याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशी अंती त्याने मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत एक लाख ८० हजार रुपये इतकी आहे. आरोपी कलीम उद्दीन हा सराईत चोरटा असल्याचे तपासात समोर आले आहे.  तो बाजारपेठा, बस स्टॅन्ड व इतर वर्दळीच्या ठिकाणी बराच वेळ उभ्या असलेल्या मोटारसायकलीचे निरीक्षण करायचा, चालकांवर लक्ष ठेवून त्याचा कार्यभाग तो उरकत होता. आरोपी सलीम उद्दीन याला स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सोनाळा पोलिसांच्या ताब्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे..

ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी बुलडाणा, श्रेणिक लोढा खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव, पोलिस कॉन्स्टेबल गोपाल तारुळकर, हर्षल जाधव, शिवानंद हेलगे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे ऋषिकेश खंडेराव यांच्या पथकाने केली..