ठाणेदार किशोर तावडे यांची कडक कारवाई!पेट्रोलपंपावर कोयता,तलवारी चालवणारे दोघे ताब्यात..दोघांचा शोध सुरू..!

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशभर पेट्रोल व डिझेलची टंचाई भासत असताना खामगाव तालुक्यातील पिंप्राळा फाट्यावरील पेट्रोलपंपावर कोयता, तलवारी चालल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
झाले असे की, अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधव, यासह एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा.हिंगणा कारेगाव) हे हातामध्ये तलवार, कोयते घेऊन पिंप्राळा फाट्यावरील के. के पेट्रोलपंप येथे २१ मे च्या रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पेट्रोल आले होते.आम्हाला आमच्या कॅन मध्ये पेट्रोल का देत नाही? असे म्हणत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालू लागले. आमच्याकडे फक्त पेट्रोलचा इमर्जन्सी स्टॉक असल्याने कॅनमध्ये पेट्रोल देवु शकत नाही असे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले होते. मात्र जाधव बंधू सह एका अनोळखी व्यक्तीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्यासोबत वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली.आपल्या हातामधील तलवारी,कोयते घेऊन भीती निर्माण करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.याच जाधव बंधू सह अनोळखी व्यक्तीला ही माहीत नव्हते की पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे असतात घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे. के.के पेट्रोल पंपाचे मॅनेजर दिलीप अवचार वय ३२ वर्ष रा. खोलखेड यांनी तशी तक्रार २२ मे रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.
खामगाव ग्रामीण पोलिसांनी अवचार यांच्या तक्रारीवरून जाधव बंधू सह एका अनोळखी व्यक्तीवर अशा एकूण चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या चार आरोपी पैकी अक्षय जाधव व चेतन जाधव याला खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार किशोर तावडे यांनी घटनेच्या काही तासातच अटक केली आहे. आरोपी जवळून तलवार, कोयता जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोहेकॉ किरण राऊत एक करीत आहे.