डोणगावात मोकाट कुत्र्यांची दहशत; चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला; लचके तोडले...

 

 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डोणगाव येथे मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. या मोकाट कुत्र्यांनी आता थेट लहान मुलांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे..विशेष म्हणजे हे मोकाट कुत्रे कळपाने हिंडतात..त्यामुळे आणखी अडचणीची बाब आहे. काल श्री शिवाजी हायस्कूलच्या ग्राउंड जवळ एका चार वर्षीय बालकावर ६ ते ७ कुत्र्यांनी सामूहिक हल्ला केला या घटनेमुळे एकच दहशत निर्माण झाली आहे..

या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी बालकाला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शे. आफताब शे इम्रान हा मुलगा घरासमोर खेळत होता. यावेळी मोकाट कुत्र्यांच्या कळपाने त्याच्यावर हल्ला केला. चिमुकल्याचा आरडा ओरडा ऐकून त्याची आजी धावत आली, आजीने चिमुकल्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले..