BIG BREAKING जळगाव जामोद येथे गणपती मिरवणुकीवर दगडफेक!आधी लाईट गेली अन्...रात्रभरापासून तणाव;
कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन न करण्याची गणेश मंडळांची भूमिका; प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात;
Updated: Sep 18, 2024, 09:45 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद येथून अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जळगाव जामोद शहरातील वायली वेस भागात गणपती मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. तेव्हापासून गणेश मंडळांनी गणपती जागेवरच ठेवले असून जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, दंगाकाबू पथक यासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जळगाव जामोद मध्ये तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीवर दगडफेक होत असल्याचे काही व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे...शहरात बंद सदृश्य परिस्थिती आहे.