STATE CRIME NEWS दोन मित्रांनी एकत्र संपवली जीवन यात्रा; एकाच झाडाला... वय अवघे....

 
 पुणे(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): दोन मित्रांनी एकत्रितरित्या एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. आज,१२ एप्रिलला सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे..
   प्राप्त माहितीनुसार दोन्ही मित्र अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आहेत. तुषार ढगे आणि सिकंदर शेख अशी आत्महत्या केलेल्या दोन मित्रांची नावे आहेत. तुषार चे वय २५ तर सिकंदर ३० वर्षाचा होता. दोघेही जिवलग मित्र होते. घटनेच्या आदल्या दिवशी ते पुण्यात आले होते..त्यानंतर आज पिंपरी चिंचवड भागातील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील निर्जन स्थळी एकाच झाडाला दोघांची मृतदेह लटकलेले दिसले.. प्राथमिक तपासात दोघांनी आत्महत्या केल्याचे दिसत आहे. भोसरी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दोन मित्रांनी अचानक टोकाचा निर्णय का घेतला? एकत्रित आत्महत्या करण्याचे कारण काय ? याबाबत गुंतागुंतीचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत..