STATE CRIME सासरा आणि सुनेचे होते अनैतिक संबंध; नवरा बाहेर गेला की सुन सासऱ्यासोबत ठेवायची संबंध; अडसर ठरणाऱ्या तरुणासोबत नको ते घडलं....म्हणे छातीत दुखत होत..

 
 नंदुरबार(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): खरे तर सून आणि सासरा हे नातं म्हणजे लेक आणि वडिलांसारखं नातं...मात्र या नात्याला काळीमा फासला गेलाय तो नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील मंडारा येथे..२० वर्षांची सून आणि सासर्‍याचे अनैतिक संबंध जुळले..नवरा बाहेर गेला की ती चक्क सासऱ्या सोबत सगळ काही करायची...हे संबंध एवढे टोकाला पोहोचले की सुनेला पती आणि सासऱ्याला त्याचा मुलगा नकोसा वाटू लागला..त्याचा पत्ता कट झाला म्हणजे आपण मोकळे अस त्या दोघांना वाटू लागलं आणि त्याच भावनेतून दोघांनी मिळून त्याचा गेम केला..!

प्राप्त माहितीनुसार सासरा आणि सुनेच अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधात अडसर ठरतो म्हणून सुनेने आणि सासऱ्याने मिळून २२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दोघांकडून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचाही प्रकार झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी भर दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी मृतक तरुणाच्या पत्नी व वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
 नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मंडारा येथील एका व्यक्तीचे त्याच्या सुनेशी अनैतिक संबंध होते. या संबंधात मुलगा सुकलाल अडथळा ठरत होता. सुकलाल बाहेरगावी किंवा शेतात गेला की त्याची पत्नी सासऱ्या सोबत शारीरिक संबंध ठेवायची. दोन दिवसांपूर्वी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुकलाल चा काटा काढायचे सुन आणि सासऱ्याने ठरवले. दोघांनी सुकलाल चा गळा दाबून खून केला. त्यानंतर सुकलाल याचा मृत्यू छातीत दुखत असल्यामुळे झाल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगत अंत्यसंस्कार उरकण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. सुन आणि सासऱ्याची कसून चौकशी केल्यावर दोघांनी खुनाची कबुली दिली...