भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; रस्ते अपघातात माय-लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू; खामगाव-नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ भीषण घटना !

 
खामगाव (बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा):खामगाव-नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत माय आणि तिच्या चिमुकल्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात पती मात्र थोडक्यात बचावले.
अपघातात सौ. शीतल दिलीप बोंबटकर आणि कु. श्रावणी दिलीप बोंबटकर (रा. नारायणपूर, ता. नांदुरा) यांचा मृत्यू झाला आहे. पती दिलीप प्रभाकर बोंबटकर हे गंभीर प्रसंगातून थोडक्यात वाचले.

ही घटना १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. आमसरी फाट्यासमोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फरार ट्रकचालकाचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.