भरधाव दुचाकी नाल्यात आदळली!शेंदुर्जन येथील युवकाचा मृत्यू...

 
 शेंदुर्जन (: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तालुका सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील गणेश शिवाजी गरडकर (वय २५) या युवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. गणेश सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयात कार्यरत होता. 
 नेहमीप्रमाणे ६ एप्रिल रोजी काम आटपून तो घरी परतत असताना दुसरबीड येथील गणपती मंदिराजवळ त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. गाडी नाल्याच्या बाजूला जाऊन आदळल्याने गंभीर अपघात झाला.त्यानंतर तातडीने गणेशला जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत गणेश यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.