झोपेची डुलकी जीवावर बेतली! समृद्धीवर ट्रकचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू...

 
 
दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोल नाक्याजवळ २८ एप्रिलच मध्यरात्री २:२० वाजेच्या सुमारास अपघातात झाला. या अपघातामध्ये चालक ठार, तर एक गंभीर रित्या जखमी झाला आहे.
Buldana live banner
जागरूक रहा

चालक गणेश गायकवाड (४०), बिडकीन, छत्रपती संभाजीनगर हे ट्रक घेऊन नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, दुसरबीड टोलनाक्याजवळ झोपेची डुलकी लागल्याने वाहन अनियंत्रित होऊन दुसरबीड इंटरचेंजजवळील आयसी-१२ असलेल्या लोखंडी पोलला जोरदार धडक दिली. या अपघातात चालक गणेश गायकवाड यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर बाजूला बसलेले मच्छिंद्र क्षीरसागर पांग्रा, संभाजीनगर, हे गंभीर रित्या जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचली. १०८ अॅम्ब्युलन्सच्या डॉक्टर यासीन शाहा आणि मंगेश काळे यांनी जखमीला प्राथमिक उपचार देत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. तसेच, क्यूआरव्ही टीमचे सदस्य श्रीकृष्ण बच्छिरे, तुषार तांदळे, नितीन बिसेन आणि पवन काळे यांनी कटरच्या साह्याने वाहनातून मृत आणि जखमीला बाहेर काढले.