न्यायालयीन तारखांना दांडी मारणे सहा जणांना भाेवले; अमडापूर पाेलिसांनी केली अटकेची कारवाई..!
Sep 17, 2025, 15:33 IST
अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : न्यायालयाच्या तारखांना दांडी मारणे सहा जणांना चांगलेच भाेवले आहे. या सहाही आराेपींना अमडापूर पोलिसांनी अटक वॉरंटनुसार पकडले. या आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अमडापूरचे ठाणेदार एपीआय निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाकडून प्राप्त वॉरंटमधील फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. पोहेकॉ शिवाजी सुरडकर यांच्या नेतृत्वात गजानन काकडे, धर्मराज पवार, रणजित सरोडे व वैशाली आराख यांनी १५ सप्टेंबर रोजीशोधमोहीम राबविली.
विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्यात आली.
दहिगाव येथील योगेश दशरथ लहाने (३५), दशरथ कचरू लहाने (६२), भास्कर हरिभाऊ लहाने (३६), हरणी येथील धनराज मोहनसिंग मोहिते (३५), पेठ येथील दामोधर साहेबराव तायडे (३५), घानमोड येथील पंकज दगडू सोळंके या आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. योगेश लहाने, दशरथ लहाने, भास्कर लहाने, दामोधर तायडे व पंकज सोळंके यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.