लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, युवती सहा महिन्यांची गर्भवती; आराेपी युवकासह दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल !

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना ३ ते ७ मे २०२५ दरम्यान शेगाव व मलकापूर परिसरात घडली. वारंवार शारीरीक संबध ठेवल्याने ही युवती गर्भवती झाली आहे. त्यानंतर युवकाने लग्नास नकार दिल्याने युवतीने शेगाव शहर पाेलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून पाेलिसांनी २६ ऑक्टाेबर राेजी युवकासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. 
पिडीत तरुणीने पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिची ओळख आरोपी संदीप गणेश राखोंडे व मोहन गणेश राखोंडे यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. संदीप राखोंडे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शेगाव येथील एका गेस्ट हाऊसमध्ये चार ते पाच वेळा तसेच मलकापुरातील एका शेतात दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. ही बाब मोहन राखोंडे याला सांगितल्यावर त्याने तिला धमकी दिली, असे फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), ६४ (१), ६४ (२)(एम), ६९ नुसार दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बारंगे करीत आहेत.