सिंदखेड राजा तहसीलदार ॲक्शन मोडवर! रेतीमाफियांच्या मुळावर घाव;११ ट्रॅक्टर, १ जेसीबी, पोकलॅण्ड मशीन पकडले...

 
 सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा तहसीलदार यांनी रेतीमाफीयांवर मोठी कारवाई केली आहे. नवीनच रुजू झालेले तहसीलदार दिवटे यांना ट्रेलर दाखवला असून यापुढे कशी भूमिका राहील त्याचा एकप्रकारे इशाराच दिला आहे. दुसरबीड परिसरात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांना तहसीलदारांनी कारवाईचा दणका दिला. या कारवाईत तब्बल ११ ट्रॅक्टर, १ जेसीबी आणि १ पोकलॅण्ड मशीन ताब्यात घेण्यात आले आहे.

सिंदखेड राजा तहसीलदार अजित दिवटे, मंडळ अधिकारी मनसुटे, दुसर बीड येथील तलाठी आर.एस. देशमुख, राहिली येथील तलाठी एस.टेकाळे, जवळका येथील तलाठी लांडगे या पथकाने ही कारवाई केली. या करवाईने रेतीमाफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.