माेहेगावात अतिक्रमण काढण्यावरुन राडा! पाेलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला, दाेन कर्मचारी जखमी; गावात बंदाेबस्त तैनात, एसआरपीएफच्या जवानांना केले पाचारण!
Updated: Jul 23, 2025, 17:00 IST
माेताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील माेहेगाव येथे प्रशासनाच्या वतीने २३ जुलै राेजी अतिक्रमण हटाव माेहिम राबवण्यात आली. अतिक्रमण हटवण्यास ग्रामस्थांनी तीव्र विराेध केला. या विराेधातून ग्रामस्थांनी पाेलिसांवर हल्ला केला. यामध्ये एक एसआरपीएफचा जवान आणि पाेलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माेताळा तालुक्याती माेहेगाव येथे अतिक्रमण हटवण्यासाठी आज पाेलीसांच्या बंदाेबस्तात प्रशासन पाेहचले हाेते. या अतिक्रमण हटाव माेहिमेस ग्रामस्थांनी विराेध केला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाेलिसांवर हल्ला केला. यामध्ये एक एसआरपीएफचा जवान आणि एक पाेलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पाेलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.