मेहकरात राडा! तिघांनी मिळून एकाला बेदम मारले....

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :वडिलांना शिवीगाळ का केली असे विचारल्यामुळे तिघांनी एकास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटनास्थळी मेहकर येथील इमामवाडा चौकात घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेख मुज्जमील शेख मुकबील कुरेशी रा.माळीपेठ, मेहकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी इमामवाडा चौकात त्यांनी शेख रिजवान शेख कदीर कुरेशी, शेख रिहान शेख कदीर कुरेशी व शेख रियाज शेख बशीर कुरेशी सर्व रा.मेहकर यांना तुम्ही माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली' असे विचारले असता आरोपींनी संगनमत करून 'शिवीगाळ केलीच आहे, तुला काय करायचे आहे', असे म्हणत मुज्जमील यांच्या डोक्यावर लोखंडी झाऱ्याने वार करत मारहण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अश्या तक्रारीवरून मेहकर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.