धक्कादायक! प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या; तरुणाच्या इंस्टाग्राम पोस्ट वरून सगळ काही उघड झालं; ९ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल! मेहकर तालुक्यातील घटना

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील एका गावातील तरुणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इंस्टाग्रामवर काही पोस्ट केल्या, काही कॉल रेकॉर्डिंग देखील पोस्ट केल्या त्यामुळे आत्महत्येचे कारण उघडं झाले. पोलिसांनी याप्रकरणी तब्बल ०९ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे..तरुणाच्या चुलत्याने याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
  राहुल आणि पायल (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. राहुल हा मेहकर तालुक्यातील एका गावचा असून पायल सिंदखेड राजा तालुक्यातील एका गावची आहे. दोघांच्या लग्नांच्या मुलीकडच्या लोकांचा विरोध होता. त्यातून पायलचे लग्न नात्यातीलच एका मुलाशी ठरले होते. राहुल आणि पायलच्या संबंधाबाबत पायलच्या घरच्यांना माहीत झाल्यावर तिच्या घरातून विरोध सुरू झाला होता..
इंस्टाग्रामवर पोस्ट करून आत्महत्या..
दरम्यान राहुल ने काल संध्याकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी त्याने इंस्टाग्राम वर पोस्ट करुन कुणाच्या दबावात आत्महत्या करीत आहे ते लिहिले. याशिवाय गावातील काही लोकांच्या व्हाट्सअप वर मेसेज करूनही राहुलने आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. त्यानुसार मुलीच्या आत्याच्या पुतण्याने त्याला आणि त्याच्या आईला नीट राहण्याची धमकी दिली. पायलच्या वडिलांनी देखील राहुलला सामूहिक आत्महत्या करण्याची धमकी दिली, नाहीतर तू मर असेही सांगितलें. तक्रारीनुसार आरोपींनी राहुलला वेळोवेळी मारण्याची धमकी दिल्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे म्हटले आहे. तक्रारीवरून पायल चे आई वडील, आत्या, आत्याचा नवरा, आत्याचा पुतण्या यांसह एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.