धक्कादायक..! तिला दोनदा जाळून टाकण्याचा प्रयत्न! मुलगा झाला नाही म्हणून चिमुकलीला विहिरीत टाकण्याचा प्रयत्न.! म्हणे, पोलिस माझं काहीच वाकड करत नाही...!–
जळगाव जामोद पोलिसांना तिने ऐकवली अंगावर काटा आणणारी छळकहानी..!
ममता साजन सोळंके(२०) या विवाहितेने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. २०२१ मध्ये मोहिदपूरच्या साजन सोळंके याच्याशी तिचे लग्न झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरच्या लोकांनी तिला चांगले वागवले मात्र त्यानंतर घरातील लहान सहान कारणावरून सासू सासरे व पती मानसिक त्रास देत होते असे तक्रारीत म्हटले आहे. पतीला व सासर्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत असताना एके दिवशी पती आणि सासऱ्याने तिला धरून ठेवले, सासूने पोटावर लाथा मारल्या यामुळे तिचा गर्भपात झाला. विवाहितेचा पती साजन हा विवाहितेचे मजुरीचे पैसे घेऊन दारू पिऊन येतो, घरात कोणतेही स्वयंपाकाचे सामान आणत नाही. याबद्दल विवाहितेने नवऱ्याला म्हटले असते त्याने व सासूने विवाहितेला दोन वेळा जाळून जीवाने मारण्याचा प्रयत्न केला.
तिला वडील नव्हते म्हणून..
विवाहितेच्या बाहेरकडील आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. वडील वारलेले आहेत, त्यामुळे विवाहिता सर्व काही सहन करत होती. दरम्यानच्या काळात विवाहितेला मुलगी झाली, मात्र मुलगाच पाहिजे होता असे म्हणत सासरच्या लोकांचा त्रास वाढला. सासरच्या लोकांनी चिमुकल्या मुलीला विहिरीत टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र गावातील लोकांनी चिमुकलीला वाचवले.
असे विवाहितने पोलिसांना सांगितले आहे. या सगळ्या प्रकाराला कंटाळून विवाहिता माहेरी राहत होती. मध्यस्थांनी तिच्या पतीची व कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते सातत्याने फारकतीची मागणी करत आहेत त्यामुळे त्रास असह्य झाल्याने विवाहितेने पोलिसात तक्रार दिली आहे...