धक्कादायक! २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या...

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. २२ एप्रिलच्या सकाळी साडेअकराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
संतोष गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आई वडील कामासाठी शेतात गेलेले असताना संतोषने राहत्या घरात गळफास घेतला. वडिलांवर असलेल्या कर्जापाई संतोषने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.