

धक्कादायक! वडिलांनी हातातून मोबाईल हिसकला म्हणून मुलाने आत्महत्या केली! देऊळगावराजा तालुक्यातील घटना....
Apr 25, 2025, 08:34 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वडिलांनी हातातून मोबाईल हिसकल्याचा राग धरून अकरावीत शिकणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ एप्रिल २०२५ तालुक्यातील जवळखेड येथे घडली.
अनिकेत तुळशीदास अवघडराव (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अनिकेत हा गावातील गणेश विद्यालय येथे शिक्षण घेत असून नुकतेच बोर्डाची परीक्षा पास करून तो ११ व्या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. काल दुपारी वडिलांनी हातातील मोबाईल हिसकावला म्हणून घरातील छताला गळफास लावून अनिकेत ने आपले जीवन संपवले. सदर घटना सायंकाळी पाच वाजे सुमारास उघडकीस आली. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात अनिकेतला दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या दुर्दैवी घटने बद्दल समाज मनात हळहळ व्यक्त होत आहे.