धक्कादायक! शेगावात घडलं पाप; १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, फोटोही काढले...

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात बलात्काराच्या सर्वाधिक घटना शेगावात घडल्याचे समोर आले आहे. आता १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी शेगावातून समोर येत आहे. विशेष म्हणजे आरोपीने बलात्कार करीत असताना त्या संबंधाचे फोटो देखील काढले आहेत.

  वैभव समाधान कराळे असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार शेगावातील एका लॉजवर ही घटना घडली. आरोपी वैभवने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ३ मार्चच्या दुपारी एका लॉजवर नेले. तिथे वैभवने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. यावेळी वैभवने फोटो देखील काढले..फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील आरोपी वैभवने दिल्याचे मुलीने म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६४(स) ३५१(२) भारतीय न्याय संहितेनुसार सहकलम ४,८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..