धक्कादायक! जळगाव जामोद मध्ये अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाच्या नावाखाली भलताच खेळ! अश्लील मागणी अन् लैंगिक छळाचा आरोप, तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप. क्र. ५७७/२०२६ नुसार बीएनएस कलम ७४, ७५, ७८, ३५१(३) तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियमातील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी २१ वर्षीय तरुणाने आपल्या अल्पवयीन बहिणीच्या छळाबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, आरोपी जमील खान (रा. जळगाव जामोद) हा मागील सुमारे दोन महिन्यांपासून पीडितेचा पाठलाग करून तिला धमकावत होता. तसेच तिच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आणि एकांतात गाठून लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
अखेर पीडितेने कुटुंबीयांना आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी मपोउपनि स्नेहा शेडगे यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोउपनि गणेश कायंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माचरे, मलकापूर आणि पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी रात्री पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.