धक्कादायक ! मलकापुरात अत्याभावाने अल्पवयीन मामेबहीणवर केला लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,आरोपीस अटक...

 
मलकापुर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरी शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मामेबहीणवर आतेभावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून २५ वर्षीय युवकाविरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.आरोपी युवकास पोलिसांनी  अटक केली आहे.
फिर्यादी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी (नाव गोपनीय) मलकापुर येथील शिवाजीनगर परिसरात तिच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. या काळात आरोपी रोहित (वय २५) याने १ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत, घरातील इतर सदस्य बाहेर असताना, मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
आरोपीने मुलीला धमकी दिल्यामुळे तिने बराच काळ हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र नंतर तिने आपल्या आईकडे संपूर्ण घटना सांगितल्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.५५ वाजता मलकापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई पोलीस हवालदार मोहम्मद रिझवान (ब.नं. ५१४) यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.