धक्कादायक! ताटात उष्टे अन्न ठेवले,या कारणावरून जन्मदात्या वडीलांची केली हत्या; संग्रामपूर तालुक्यातील बाेडखा येथील घटना; मृतदेह प्लास्टीकच्या पाेत्यात भरून टाकला पूर्णा नदीत..!

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकला. ही धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे १३ ऑगस्ट रोजी घडली हाेती. ही घटना १९ ऑगस्ट राेजी उघडकीस आली आहे. रामराव तेल्हारकर असे मृतक वडीलांचे तर शिवाजी रामराव तेल्हारकर असे आराेपी मुलाचे नाव आहे. 
या प्रकरणी मृतकाच्या सुनेने पाेलिसात फिर्याद दिल्यानंतर आराेपी मुलाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तु घरकाम करीत नाहीत, घराकडे लक्ष देत नाही, अशी विचारणा वडीलांनी मुलाला केली. त्यानंतर ताटात उष्टे अन्न ठेवल्यावरून रामराव तेल्हारकर यांच्याबराेबर त्यांचा मुलगा शिवाजी तेल्हारकर याने वाद घातला. तसेच या वादातून त्याने वडीलांवर कुर्हाडीने वार केले. यामध्ये रामराव तेल्हारकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने शिवाजी तेल्हारकर याने वडीलांचा मृतदेह प्लास्टीकच्या पाेत्यात टाकून पूर्णा नदीच्या पुरात फेकुन दिला.ही घटना १९ ऑगस्ट राेजी समाेर आल्याने या घटनेने बिंग फुटले. या प्रकरणी आराेपीच्या पत्नीनेच पाेलिसात फिर्याद दिली. त्यावरून पाेलिसांनी आराेपी शिवाजी तेल्हारकर विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.