

धक्कादायक..! आईचं अफेयर त्याला कळलं अन् भररस्त्यात पडला रक्ताचा सडा...
Feb 3, 2025, 08:25 IST
पुणे(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): अनैतिक संबंधातून काय घडेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी बुलडाण्यातल्या दाभाडी येथे पतीनेच पत्नीचा खून केल्याचा प्रकार घडला होता. मेव्हणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने नराधम पतीने बायकोचा जीव घेतला होता. आता पुण्यातल्या कोथरूड भागात एक धक्कादायक घटना घडली आहे..३ अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा भररस्त्यात खून केला आहे..पोलीस तपासात या प्रकाराला अनैतिक संबधाची किनार असल्याचे समोर आले आहे.
कोथरूडच्या आशिष गार्डन समोर राहुल सागर या तरुणावर ४ जणांनी हल्ला केला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. स्थानिकांनी राहुल याला जवळच्या रुग्णालयात नेले तिथे उपचार सुरू असताना राहुलचा मृत्यू झाला..
राहुलवर हल्ला करणाऱ्या चारही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान पोलीस चौकशीत या खुनाचे धक्कादायक कारण समोर आले. राहुलवर हल्ला करणारे चारही आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यातील एका मुलाच्या आईशी मृतक तरुणाचे अनैतिक संबंध होते. ही बाब मुलाला माहीत झाल्यानंतर राहुलचा काटा काढायचा प्लॅन रचला गेला..