धक्कादायक! शेतीच्या वादातून नातवानेच केला आजीचा खून; गळा आवळून केली हत्या! नांदुरा तालुक्यातील गोसिंग गावातील घटना..!

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतीच्या वादातून नातवानेच ७५ वर्षीय आजीचा गळा आवळून खून केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील गाेसिंग येथे ५ ऑगस्ट राेजी घडली. या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी ६ ऑगस्ट राेजी आराेपी नाताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अंजनाबाई ओंकार सुरडकर असे मृतक वृद्धेचे नाव आहे तर प्रविण शांताराम सुरडकर असे आराेपी नातवाचे नाव आहे. 
नांदुरा तालुक्यातील गाेसिंग येथील अंजनाबाई सुरडकर यांच्या नावावर आठ एकर शेती आहे. यापैकी सहा एकर शेती आणि अर्धी पेंशन नावावर करण्याचा तगादा आराेपी प्रविण सुरडकर हा अंजनाबाईकडे लावत हाेता.मात्र, शेती नावावर करून देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या प्रविणनने आजीचा गळा आवळून खून केला. शेतात गेलेले कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार समाेर आला. पाेलिसांनी प्रविण सुरडकरला ताब्यात घेवून चाैकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी आराेपी प्रविण सुरडकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत.