धक्कादायक..! मुलं होत नाही म्हणून कुणी बायकोसोबंत असं करत का? बायकोला आधी पॉर्न व्हिडिओ दाखवायचा नवरा अन् नंतर.. धाड येथील घटना! ठेकेदार आहे नवरा...

 
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुल होत नाही म्हणून २४ वर्षीय विवाहितेचा प्रचंड छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाची तक्रार विवाहितेने तिच्या माहेरी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात दिली होती. प्रकरण धाड येथील आहे. विवाहितेने तक्रारीत सांगितलेली छळकहाणी अंगावर काटा आणणारी आहे. याप्रकरणातील आरोपी हा धाड येथील ठेकेदार आहे.
  अल्फिया अनम मोहम्मद शेहबाज (२४) या विवाहितेने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. विवाहिता गेल्या ३ महिन्यांपासून तिच्या माहेरी देऊळगावराजा येथे राहते. गेल्या ४ वर्षांपासून तिचा हुंड्यासाठी व मुल होत नसल्याकारणाने प्रचंड छळ होत होता. धाड येथील तिचा पती मोहम्मद शहबाज याच्यासह सासरच्या मंडळींनी अतोनात छळल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
 
आधी पॉर्न दाखवायचा....
 
विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा नवरा तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील चित्रफीत दाखवायचा व तसाच आग्रह धरायचा. विवाहितेला मुल बाळ होत नसल्याने तिचा बळी देण्यासाठी सासूने विवाहितेच्या बिछान्याजवळ लिंबू व अघोरी पूजेचे साहित्य टाकल्याचाही आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. एके दिवशी विवाहितेने पाणी गरम करण्यासाठी शेगडीवर ठेवले असता त्यात सासरच्या लोकांनी करंट सोडल्याचेही तक्रारीत नमूद आहे. शिवाय नवरा मोहम्मद शहबाज याने तीन वेळा तलाक तलाक तलाक असे म्हणून तलाक दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेचा पती मोहम्मद शहबाज याच्यासह सासरा,सासू, दिर, जाऊ आणि दोन नणंद अशा ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.