धक्कादायक! अंगावर वीज पडून शेतमजूर महिलेचा दुर्दैव मृत्यू ,दोन महिला मजूर गंभीर जखमी..खामगाव तालुक्यातील घटना..

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यात संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे वीज पडून एक शेतकरी महिला मजूर जागीच ठार झाल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. दोन शेतकरी महिला मजूर गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

खामगाव तालुक्यातील घारोड शिवारात आज संध्याकाळी चार वाजता च्या सुमारास सौ कोकिळाबाई प्रकाश परकाळे (५०) रा.घारोड ह्या शेतमजुरी करून शेतातुन घरी येत होत्या यावेळी त्याच्या सोबत सौ कांताबाई दिगांबर परकाळे (५५), सौ दुर्गा भगवान खोमणे (३४) रा.घारोड ह्या सुद्धा होत्या. मात्र यावेळी अचानक वीज पडून सौ कोकिळाबाई प्रकाश परकाळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.सोबत असणाऱ्या सौ दुर्गा भगवान खोमणे,कांताबाई दिगांबर परकाळे ह्या गंभीर जखमी झाल्या असून दोघींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.